प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल तहसीलदार कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन समिती अस्तित्वात नाही असे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पनवेल शाखा अध्यक्ष सुभाष फडके यांना उपलब्ध माहितीनुसार माहिती देण्यात आली आह पनवेल तहसील कचेरी मध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समिती त्याची यादी व त्याचे पदाधिकारी तसेच त्याच्या झालेल्या बैठकाबाबत माहिती अधिकारात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पनवेल चे अध्यक्ष श्री सुभाष फडके यांनी माहिती मागितली होती त्यांना उपलब्ध माहिती पनवेल तहसील कार्यालयामधून मिळाली आहे त्याप्रमाणे पनवेलमध्ये सन 2015 पासून भ्रष्टाचार निर्मूलन समिती अस्तित्वात नाही असे आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे तसेच जनतेच्या हिताचे जे कायदे आहेत त्याबाबत पनवेल तहसीलदार हे अतिशय उदासीन आहेत कारण माहिती अधिकारांमधील कलम चार ख ही माहिती अनेक पत्रव्यवहार केल्यानंतर दोन वर्षांनी अपूर्ण माहिती प्रसिद्ध केली आहे त्याच्यामध्ये कार्यालयाचा संपर्क नंबर हा गेल्या कित्येक वर्ष नादुरुस्त आहे तसेच माहिती अधिकारातील कलम चार ख मधील एक ते सतरा मुद्द्यांपैकी नवव्या मुद्द्यांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन ते रुजू झालेले दिनांक यामध्ये श्री संतोष पाटील(मंडळ अधिकारी)यांची नियुक्ती दिनांक १३/०८/२०२१व श्री सुभाष राठोड (अव्वल कारकून) यांची पनवेल येथे नियुक्ती दिनांक २३/०९/१९ दाखविलेलीआहे ती परंतु पनवेल मध्ये कित्येक लोक त्यांना गेला वीस वर्षापासून पाहत आहे त्यामुळे लोकांना दिशाभूल करणारी व खोटी माहिती प्रसिद्ध केली आहे तसेच पनवेल तहसील कार्यालयाने किती लोकांना लाभ दिला त्या लाभार्थ्यांची यादी त्यामध्ये प्रसिद्ध केली नाही तसेच जन माहिती अधिकारी कोण आहेत अपील अधिकारी कोण आहेत याबाबत दर्शनी भागात कोणताही बोर्ड लावलेला नाही अशा प्रकारे शासनाने जे ध्येय धोरण आखले आहे त्याच्या नेमके विरुद्ध जाऊन पनवेल तहसील मध्ये कामकाज चालू आहे.
भ्रष्टाचार निर्मूलन करता शासन अथक प्रयत्न करत आहे देशामध्ये सुशासन यावं याकरिता अँटी करप्शन ब्युरो याची स्थापना झाली आहे त्याचा बोर्ड प्रत्येक शासकीय कार्यालयात असला पाहिजे असे नेम आहेत परंतु पनवेल तहसील कचेरी मध्ये अशा प्रकारचा बोर्ड कुठेही लावलेला दिसत नाही याचा अर्थ पनवेल तहसील कार्यालय हे भ्रष्टाचार मुक्त आहे की भ्रष्टाचार खोर आहे येथे कमिशन खोरी ,टोला बाजी, कटमणी असे प्रकार चालत नसावे याकरिता पनवेल मध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समिती, रेशनवरील दक्षता समिती नाही का असे प्रश्न आहे कारण पनवेल मध्ये प्रत्येकाला नियमाप्रमाणे धान्य मिळत असावे याकरिता पनवेल तालुका दक्षता समिती नसेल असे मला वाटते ते प्रत्येक नागरिकाचा काय अनुभव आहे ते त्यांनी स्वतःला विचारून पहा व असे प्रकार थांबण्याकरता नोकर शहा पेक्षा लोकशाही मजबूत आहे हे जर आपल्याला करायचं असेल तर आपण सर्व संघटित होऊन माहिती अधिकारामध्ये प्रत्येकाने आपल्या अधिकाराला जागृत राहून माहित्या मागवल्या पाहिजेत व ज्या माहितीमध्ये भ्रष्टाचार आहे अशी प्रकरणे संबंधित लोकपाल लोक आयुक्त यांच्याकडे दिल्या पाहिजेत तरच हे गैरप्रकार बंद होतील असे मला वाटते