मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते 'अतुल परचुरे' यांचे निधन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते 'अतुल परचुरे' यांचे निधन झाले आहे. त्यांनी 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. त्यांनी साकारलेल्या पुलंच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे.

अभिनेते अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती. पण आज त्यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे.

दरम्यान, अतुल परचुरे यांनी कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर चुकीच्या उपचारांमुळे आपलं आरोग्य आणखी बिघडल्याचं स्वतः त्यांनी एकदा सांगितलं होत.एका मुलाखतीत बोलताना अतुल परचुरे म्हणाले होते की, “लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली तेव्हा ते पूर्णपणे बरे होते. ते कुटुंबासह ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला गेले होते. काही दिवसांनी मला काहीही खायला त्रास होत होता आणि मळमळ होत होती. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.माझ्या भावाने मला काही औषधे दिली पण उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. मला समजले की काहीतरी चुकीचे आहे. डॉक्टरांनी सांगितले की माझ्या यकृतामध्ये सुमारे 5 सेंटीमीटरची गाठ आहे, तो कर्करोग आहे. मी बरा होईन की नाही असे विचारले, तो म्हणाला तू एकदम बरा होशील”.ते पुढे सांगतात, “उपचार सुरू झाले पण त्याचे विपरीत परिणाम होऊ लागले. चुकीच्या उपचारामुळे प्रकृती ढासळू लागली. प्रथमच योग्य निदान न जाल्याने माझ्या स्वादुपिंडावर विपरीत परिणाम झाला. चुकीच्या उपचारांमुळे माझी प्रकृती सतत खराब होत गेली.

मला चालताही येत नव्हते आणि स्पष्ट बोलता येत नव्हतं. मग डॉक्टरांनी दीड महिना वाट पाहण्यास सांगितलं. शस्त्रक्रियेमुळे कावीळ आणि यकृतात पाणी भरण्याची भीती आहे, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो असंही सांगितलं. यानंतर मी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार केले,” असा खुलासा त्यांनी केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post