जाहिरात :
अशी माहिती ऍड ममतेश आवळे यांनी दिली..............
प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
मुं बई: बदलापूर शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. आता या प्रकरणातील शाळेचे संस्थापक आणि सचिवाला अखेर अटक करण्यात आली आहे. कर्जत परिसरातून या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे.गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही लपून बसले होते. अखेरीस पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळा चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी हायकोर्टामध्ये अटकपूर्वी जामीन अर्ज दाखल केला होता. पण हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. ठाणे पोलिसांनी कर्जत परिसरातून दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांनाही उद्या गुरुवारी कोर्टात हजर करणार आहे.
हा एन्काउंटर नाही...
दरम्यान, उच्च न्यायालयाने एन्काउंटरवर अनेक प्रश्न उपस्थित केले. उच्च न्यायालयात सरकारी वकिलांकडून प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. मात्र एका प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. अक्षयला तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडवर ठाण्याला नेले जात असताना मुंब्रा बायपासजवळ त्याने पोलीस व्हॅनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची पिस्तूल खेचली. त्यानंतर गोळीबार केला. यात एका पोलीस अधिकाऱ्याच्या पायात गोळी लागली. तेव्हा स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला आणि यात अक्षयचा मृत्यू झाला असे पोलिसांनी जबाबात सांगितलेय.
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर किती वेळात रुग्णालयात पोहोचले असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला. यावर सरकारी वकिलांनी २५ मिनिटात असे उत्तर दिले. तर जवळ कोणते सरकारी रुग्णालय नव्हते का? असेही उच्च न्यायालयाने विचारले. सरकारी वकिलांनी सांगितले की, सदर घटनेनंतर आरोपीसह जखमी पोलिसांना तातडीने रुग्णालयात नेले. 23 सप्टेंबरच्या संध्याकाळी 7:52 वाजता डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केले. 24 सप्टेंबरच्या 4:56 या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर 8 वाजता बॉडी जेजेत पोस्टमार्टमसाठी पाठवली. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले आहे. जखमी पोलिसाच्या मांडीतून गोळी आरपार गेली आहे.
हा एन्काउंटर नाही...
चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही. न्यायालयाची दिशाभूल सहन केली जाणार नाही. प्रथमदर्शनी हे काही एन्काउंटर नाही. पोलिसांवर संशय नाही पण चौकशी योग्य व्हायला हवी. रिव्हॉल्व्हर होता की पिस्तूल? किती डिस्टेंसने गोळी झाडली? असं म्हणत न्यायालयाने कडक ताशेरे ओढले.