प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - श्रम फौंडेशनचे संस्थापक कमलाकर सारंग आणि त्यांच्या टिमने दीपावलीनिमित्त समाजातील गरीब व गरजू लोकांना कपडे वाटण्यात आली.या संस्थेच्या माध्यमातून समाजातील नागरिकांना जुने किंवा नवे वापरात नसलेली कपडे टाकून देण्यापेक्षा आमच्या संस्थेत जमा करण्याचे आवाहनह केले होते.त्या आवाहना नुसार समाजातील दानशूर आणि सामाजिक कार्यकर्त्यानी भरभरून प्रतिसाद देऊन घरातील जुनी कपडे धुऊन आणि इस्त्री करून श्रम फाउंडेशनला जमा केले.या फौंडेशनने कोल्हापूर कलेक्शन सेंटर येथे समाजातील गरजुंना दिपावली सणाचे औचित्य साधून कपडे वाटप करण्यात आले.
या मध्ये लहाना पासून वृध्दा पर्यत ज्याच्या त्याच्या मापाची कपडे वाटप करण्यात आले.या वेळी त्या गरजूच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वहात होता.लाभ घेतलेल्या गरजूनी श्रम फौंडेशनचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.या वेळी श्रम फौंडेशनचे संस्थापक कमलाकर सारंग, देवदास व्हटकर, अरुण कदम आणि हनुमान नगर मधील नागरिक तसेच वेंकटेश्वर प्रोव्हीजन चे मालक सचिन हीलगे यांच्या विशेष सहकार्याने मृणाल सांरंग ,सचिव वैशाली सारंग ,ऍडव्होकेट पांडुरंग कावणेकर ,दीपाली कावनेकर आणि मिलिंद महामुनी यांच्या विशेष सहकार्याने पार पडला.