प्रेस मीडिया लाईव्ह
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- शाळांना ड्रेसचा पुरवठा करण्यारया ठेकेदाराकडे राहिलेले बिल मंजूर करण्यासाठी 80 हजार रुपये लाचेची मागणी करण्यारया जिल्हा समन्वय अधिकारी सचिन सिताराम कांबळे (वय 45.रा.देवकर पाणंद) आणि सहा.नियंत्रक अधिकारी उमेश बाळकृष्ण लिंगनुरकर (वय46.रा.सिध्दार्थनगर ) यांना 80 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडून लाचलुचपतच्या पथकाने कारवाई करून त्यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,यातील तक्रादार शाळांना ड्रेस तयार करून देण्याचे गारमेंट चालवितात .महिला विकास महामंडळा मार्फत 19 केंद्र शाळांना ड्रेस पुरवठा करण्याचा ठेका घेतला होता.सदर कामाच्या बिला पोटी या विभागाकडे मागणी केली असता एकूण देय रक्कम 18 लाख 35 हजार 814/. रुपयांच्या बिला पोटी या विभागाने 14 लाख 35 हजार रुपये बँकेत जमा केले.उर्वरित बिलाची मागणी केली असता सहा.सहनियंत्रक अधिकारी उमेश लिंगनुरकर यांची भेट घेऊन विचारणा केली असता त्यांनी उर्वरित बिल मंजूर करण्यासाठी स्वतःला आणि त्यांचा वरिष्ठ अधिकारी याला असे दोघांच्या साठी 80 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला याची माहिती दिली.या विभागाने पडताळणी केली असता लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले.या पथकातील पोलिसांनी उमेश लिंगनुरकर याला तक्रादाराकडुन लाच घेताना रंगेहात पकडून ताब्यात घेऊन कारवाई केली.
ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपाधीक्षक वैष्णवी पाटील पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला यांच्यासह त्यांच्या पथकाने केली..