प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक केल्या प्रकरणी विनायक भगवान पाटील (वय 27.रा.मानेनगर ,रेंदाळ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्या कडील साठ हजार रुपये किमंतीचा गुटखा आणि 30 हजार रुपये किमंतीची मोटारसायकल असा एकूण 90 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दुसरया कारवाईत कागल तालुक्यातील क.सांगाव येथील राज मनोज कोगले (वय 23.रा.साळोखे पार्क,कृणाल जनरल स्टोअर्स जवळ,कोल्हापूर) यांच्या कडील एक लाख 30 हजार रुपये किमंतीचा गुटखा आणि साडे तीन लाख रुपये किमंतीची मारुती सुझुकी असा एकूण साडे पाच लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात करुन त्याला कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहा.उपनिरीक्षक चेतन मसुटगे ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.