पेटिंग कामगाराचा शॉक लागून मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- मोरे -मानेनगर परिसरात असलेल्या शिवगंगा कॉलनी येथे पेटिंगचे काम करीत असताना विजय आनंदराव भोसले (वय 31.रा.तांबेकर गल्ली ,इस्पुर्ली .सध्या रा.विक्रमनगर शाहु कॉलनी,को.)याचा मंगळवार (दि.08) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास  इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागून तिसरया मजल्यावरुन खाली पडल्याने त्याला उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की,यातील मयत विजय हा पेटिंग कामगार असून त्याच्या दाजीकडे पेटिंग कामे करत होता.त्याच्या दाजीने शितल पांडुरंग खापले यांच्या इमारतीचे रंगकाम करण्याचे काम घेतले होते.आज विजय तिसरया मजल्यावर रंगकाम करीत असताना अचानक तेथुन गेलेल्या इलेक्ट्रीक सर्व्हिस वायलरला हात लागल्याने त्याला जोराचा शॉक लागल्याने तिसरया  मजल्यावरुन खाली पडुन गंभीर जखमी झाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.त्याच्या पश्च्यात पत्नी ,आई आणि विवाहित एक बहिण असून त्याचे पाच -सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post