खंडणीतील तोतया पत्रकारांना ओळख पत्र देणारया एका संघटनेच्या अध्यक्षाची पोलिसांनी केली चौकशी.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- खंडणीतील तोतया पत्रकारांना ओळख पत्रं देणारया एका संघटनेच्या अध्यक्षाची लक्ष्मीपुरी पोलिसांनी  पोलिस ठाण्यात बोलावून आज दिवसभर त्याच्याडे कसून चौकशी करण्यात आली.त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मी फक्त चौघांना त्यांचे काम पाहुन ओळखपत्र दिल्याचे सांगितले.उशीरा पर्यंत त्याच्याकडे पोलिस चौकशी करत होते.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी लक्ष्मीपुरी येथील प्लास्टिक व्यावसायिकांकडुन तीन लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी तोतया पत्रकारांसह 16 जणांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हें दाखल आहेत.आता पर्यत सहा जणांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली असून उर्वरित संशयीताचा पोलिस शोध घेत आहेत.दरम्यान या गुन्हयांतील मुख्य सुत्रधार अन्सार मुल्ला आणि एका वृत्त वाहिनीचा व्हिडीओग्राफर सागर चौगले यांचा पोलिस शोध घेत आहेत.या दुकानातील सीसीटिव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी  यात सामील असलेल्या संशयीत आरोपीची नावे निष्पन्न केली असून यात किशोर भिकाजी कांबळे,शशीकांत कुंभार ,रहिम पिंजारी ,जावेद देवडी ,सुभाष कांबळे आणि अजय सोनुर्ले यांचा समावेश असून लक्ष्मीपुरी पोलिस लवकरच त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.यातील काही जणांकडे एका संघटनेच्या नावाचे ओळख पत्र असल्याने त्या दृष्टीने पोलिसांनी त्या संघटनेच्या अध्यक्षाकडे चौकशी केल्याचे समजते.

--------------------------------------------------------------------+--+

गुटखा विक्री प्रकरणी एकावर गुन्हा.

कोल्हापूर- शनिवार पेठेतील जयभवानी चौक येथे असलेल्या नंदकिशोर किराणा स्टोअरमध्ये गुटखा विक्री केल्या प्रकरणी सुरेश कवडामल तेजवानी (वय55.रा.सिता कॉलनी,को) यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद किशोर अशोक पवार (वय 29) यांनी दिली.

गुटख्याचा साठा करून विक्री करण्याची बंदी घालण्यात आली असताना सुध्दा या किराणा स्टोअरमध्ये विमल कंपनीची सुगंधी तंबाखु व सुपारी ,पान सुपारी आणि जर्दा याचा साठा करुन विक्री होत असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना आढ़ळुन आल्याने 8 हजार 630रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post