सोळा हजारांची लाच घेताना पोलिस हवालदार ताब्यात.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर - कायदेशीर कारवाई न करण्यासाठी तक्रादाराकडे सोळा हजारांची लाचेची मागणी करणारा पोलिस हवालदार रविकांत भैरु शिंदे (वय 50.रा.पाच तिकटी येथे समीर मोरे यांच्या घरी भाड्याने हातकंणगले.मुळ रा.फणसवाडी ,ता.भुदरगड) याला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून कारवाई केली.त्याच्या विरोधात हातकंणगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की,यातील तक्रारदार यांचे कुंभोज येथे किराणा मालाचे दुकान असून त्या दुकानात गुटखाही विक्री करीत असतात.याची माहिती पोलिस हवालदार रविकांत शिंदे यांना समजताच एक महिन्यापूर्वी   तक्रारदारास शिंदे यांनी हातकंणगले पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन तुम्ही गुटखा विक्री करीत असून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची भिती दाखवत कारवाई न करण्यासाठी प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये देण्याची मागणी केली.15 तारखेला त्यांना फोन करून बोलावून घेऊन दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली .त्यात तडजोड करून प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये असे मागील चार महिन्याचे मिळुन सोळा हजाराची लाचेची मागणी केली.दरम्यान तक्रादार यांनी लाचलुचपत विभागाला याची माहिती दिली असता या पथकातील पोलिसांनी यांची खात्री करून पोलिस हवालदार शिंदे  याला तक्रारदारा कडुन सोळा हजार घेताना रंगेहात पकडून कारवाई केली.

ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक  श्रीमती वैष्णवी पाटील,पोलिस निरीक्षक बापू साळुंके पोलिस सुनिल घोसाळकर ,संदिप काशीद,सचिन पाटील,संदिप पवार आणि चालक कुराडे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post