प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- कागल तालुक्यातील रणदिवेवाडी येथे प्रेयसीचा पती सुर्यकांत विठ्ठल खोत याचा खून केल्या प्रकरणी विजय उर्फ गंभीर शिवाजी खोत (वय 32.रा रणदिवेवाडी ,कागल) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के .बी.अग्रवालसो यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून मयताची पत्नीची निर्दोष मुक्तता केली.
अधिक माहिती अशी की,मयत पत्नीचे आणि आरोपीचे अनैतिक संबंध होते.हे संबंध समजल्या पासून सुर्यकांत यांचे दारुचे व्यसन वाढ़ुन तो अस्वस्थ झाला होता.ही संधी साधून मयताच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने संगनमत करून त्याचा खून करून त्याचा मृतदेह त्याने गळफास लावून आत्महत्या केली असे भासवून कागल तालुक्यातील नदी किनारा ते एकोंडी मार्गावरील असलेल्या एका झाडाला लटकविण्यात आला होता.ही घटना 23/09/18 ते 24/09/18 च्या दरम्यान सकाळी सातच्या सुमारास घडली होती.याची फिर्याद कागल पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.
पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. बी.अग्रवालसो यांच्या कोर्टात चालून सर्वाच्या साक्षी आणि सरकारी वकील यांनी केलेला जोरदार युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपी विजय उर्फ गंभीर संभाजी खोत याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर त्याच्या पत्नीची निर्दॉष मुक्तता केली .सरकारी वकील म्हणून Ad.अमृता अनिल पाटोळे यांनी काम पाहिले.या गुन्हयांचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक दिलीप जाधव,उपनिरीक्षक पी.व्ही.भोसले (कागल पोलिस ठाणे) यांनी केला.या कामी महिला पोलिस मिनाक्षी शिंदे,मंजुषा बरकाळे आणि मेघा खोत (कागल पोलिस ठाणे) यांनी मदत केली.