खून प्रकरणातील चौघां आरोपींना अटक , स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -कागल येथे पंचतारांकित एमआयडीसी परिसरात झालेल्या खून प्रकरणी आशितोष उर्फ पप्पू आप्पासो जाधव (वय 23.रा.पट्टणकोडोली) प्रथमेश उर्फ चिक्या बाजीराव दांइगडे(वय22.रा.तळदंगे) समर्थ विजय पाटील (वय 19.रा.नवीन घरकूल ,कागल) आणि अभिषेक उर्फ नमक संजय माळगे (वय 19.रा.कोरवी गल्ली,कागल ) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून पुढ़ील तपासासाठी गोकुळशिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अधिक माहिती अशी की,खुन्नस देण्याच्या किरकोळ कारणातुन मंगळवार (दि.01) रोजी रात्रीच्या सुमारास नवनाथ बाळासाहेब चौगुले (रा.बिरदेव चौक धनगर गल्ली,तळ्ंदगे) याचा खून झाला होता.या प्रकरणी गोकुळशिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.किरकोळ कारणातुन खुना सारख्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या .या अनुशंगाने खुनाची माहिती घेत तपास करीत असताना या खुनातील आरोपी आणि त्यांचे साथीदार केआयटी कॉलेज परिसरात असलेल्या एका हॉटेल जवळ येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून त्यांना अटक करून  गुन्ह्यात वापरलेली तलवार आणि पांढ़री अक्सेस गाडी जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहा पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे,उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post