प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- भुदरगड तालुक्यातील दारवाड येथील शेतकरी बाळासो बापू चौगुले (वय 56) हे मंगळवार (दि 15) रोजी चौगलकी नावाच्या शेतात औषध फवारणी करीत असताना त्यांना विषारी सर्पाने दंश केला होता.त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना आज गुरुवारी त्यांचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे .त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि दोन मुले आहेत.
Tags
कोल्हापूर