प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - रेकॉर्डवरील चोरटी महिला गुन्हेगार ज्योती उर्फ जोताबाई नामदेव पाटील (वय 66.रा.संभाजीनगर ,नांदणी रोड लक्ष्मीनारायण हायस्कूल शेजारी ,जयसिंगपूर ) या चोरट्या महिलेस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन तिच्या कडील 2 लाख 10 हजार रुपये किमंतीचा 27gm.वजनाचा सोन्याचा धनहार जप्त करून मुद्देमालासह पुढ़ील तपासासाठी जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले .
कोल्हापूर जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या. या अनुशंगाने चोरीच्या गुन्हयांचा तपास करीत असताना रेकॉर्डवरील जयसिंगपूर येथील चोरटी महिला ज्योती पाटील या महिलेने इंचलकरंजी परिसरात असलेल्या वडगाव बाजार समिती येथील एका महिलेच्या गळ्यातील धनहार चोरला असून तो सोमवार (दि.21) रोजी विकण्यासाठी कोल्हापूर येथे ताराराणी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले असता तिच्याकडे प्लास्टिक पिशवी आढ़ळुन आली असता तिच्याकडे चौकशी केली असता चोरीची कबुली दिली.या चोरीच्या गुन्ह्याची नोंद इंचलकरंजी पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणला.
ज्योती पाटील यांच्यावर करवीर ,आणि देवरुख पोलिस ठाण्यात चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक शेष मोरे,पोलिस महेश खोत,शुभम संकपाळ,संजय कुंभार ,महेश पाटील,सुशिल पाटील,कृष्णात पिंगळे,अमित मर्दाने आणि महिला पोलिस धनश्री पाटील यांनी केली.