प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
मुरगूड - येथील साई कॉलनीत रहात असलेल्या परशुराम पांडुरंग लोकरे या शिक्षकाने पत्नी सविता परशुराम लोकरे (वय 45) यांचा मंगळवार(दि.01) रोजी सकाळी घरगुती वादातुन डोक्यात वरवंटा मारुन खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच मुरगूड पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन माहिती घेऊन आरोपीला आणि त्यांच्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की,कागल तालुक्यातील मुरगुड येथे साई कॉलनीत पेशाने शिक्षक असलेले लोकरे कुंटुबिय दोन मुलासह रहात होते . गेल्या काही वर्षापासून त्यांच्यात घरगुती वाद चालू होता.मंगळवारी सकाळी पती पत्नीत कडाक्याचे भांडण झाले या रागातुन पती परशुराम याने पत्नी सविताच्या डोक्यात जोरात मारल्याने त्यातच त्यांचा मृत्यु झाला.या घटनेची माहिती मुरगूड पोलिसांना समजताच सहा.पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी आपल्या पोलिस स्टाफसह घटना स्थळी भेट दिली.या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांना या घटनेची माहिती दिली.तात्काळ अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांनी घटना स्थळी भेट देऊन संशयीत आरोपी परशुराम याला आणि त्याच्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन अटक केली.या घटनेची नोंद मुरगूड पोलिस ठाण्यात झाली आहे.