प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-लक्ष्मीपुरी येथील प्लॉस्टिक पत्रावळ्या, द्रोण,ग्लास विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन खंडणी मागण्यास कथित सामाजिक कार्यकर्त्यासोबत एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओग्राफर सागर चौगले (वय ४५ रा. कळंबा,करवीर) हा होता. त्याने या प्रकरणात मध्यस्थी केली. तसेच त्याच्यासोबत दोघा तोतया पत्रकारांनाही तो घेऊन गेला होता. मध्यस्थी करताना त्याने शिवीगाळ केलेला व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पत्रकारांना दिली.
सनी दर्डा याचे लक्ष्मीपुरीत प्लॉस्टिक पत्रावळी विक्रीचे दुकान आहे. या दुकानात ७ ऑक्टोंबर रोजी तोतया पत्रकार अन्सार मुल्ला व त्याचे साथीदार घुसले. दुकानाची बातमी प्रसिध्द करून दुकान बंद केले जाईल. अशी धमकी देऊन दर्डा यांच्याकडून ३ लाख रुपयांची खंडणी उकळली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कथित सामाजिक कार्यकर्ता अजित पवार, मयुर कांदळकर यांच्यासह सात ते आठजण दर्डा यांच्या दुकानात घुसून दुकान बंद पाडण्याची धमकी देऊन पाच लाखांची मागणी केली.
त्यानंतर दर्डा यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली. पोलिसांनी आताप्रर्यंत पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओग्राफर सागर चौगले याची छबी दिसते. अटक केलेल्या संशयीतांकडून माहिती घेतल्यानंतर सागर चौगले हा मध्यस्थी करण्यासाठी दुकानात आला होता. त्याच्यासोबत दोन तोतया पत्रकार होते. अशी माहिती पोलीसांना मिळाली.
त्यानुसार खंडणीच्या या गुन्हयात सागर चौगले याचे नाव पुढे आले आहे. दोन दिवसांपासून पोलिसांची पथके सागर चौगले व तोतया पत्रकार अन्सार मुल्ला यांचा पोलिस शोध घेत आहेत,मात्र ते सापडले नाहीत.अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.