कोल्हापुरातील कोकेन प्रकरणी हैदराबादच्या आरोपीस अटक . स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई

 मुंबईच्या विशाल व हैदराबादच्या मम्मीदि राजेंद्र शेट्टी यांना 17 ता. पर्यन्त कोठडी.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- कोकेन विक्री प्रकरणातील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने हैदराबादच्या मम्मीदि राजेंद्र शेट्टी याला हैदराबाद येथून ताब्यात घेऊन अटक केली.आज याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 17 तारखे पर्यन्त पोलिस पोलिस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आता प्रर्यत कोल्हापूरच्या निलेश जाधव ,मुंबई येथील विशाल तांबडे आणि हैदराबादच्या मम्मीदि राजेंद्र शेट्टी यांना अटक केली असून या तिघांना न्यायालयाने 17 ता.प्रर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

निलेश जाधव यांची मुळचा कोल्हापुरातील सध्या मुंबई येथे शेअर मार्केटर म्हणुन काम करीत असलेला विशाल तांबडे याच्याशी ओळख होती.निलेश ही या क्षेत्रात काम करीत होता.पण त्यात त्याला अपयश आल्याने आर्थिक संकटात सापडला होता.या मुळे तो कोकेन सारख्या अंमली पदार्थ विक्रीचा विचार त्याच्या मनात आल्याने विशाल कडुन कोकेन विक्री साठी घेतल्याचे चौकशीत दिसून आले.पोलिसांनी विशालकडे चौकशी केली असता हैदराबादच्या मम्मीदि राजेंद्र शेट्टी यांचं नाव तपासात निदर्शनास आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक जाधव आणि त्यांचे पोलिस पथक रवाना होऊन हैदराबाद येथे आरोपीस ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर पोलिस उपनिरीक्षक चेतन मसुटगे,जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली..

Post a Comment

Previous Post Next Post