प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- चंदगड तालुक्यातील शिनोळी खुर्द्द.स्थानिक गुन्हें अण्वेषण पथकाला सर्फराज निसार ताशिलदार यांच्या मालकीच्या बंद असलेल्या इमारतीत पत्याचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली असता शुक्रवार (दि.25) रोजी त्या परिसरात छापा टाकून त्या ठिकाणी या खेळाचा मुख्य मालक रतन शंकर पचेरवाल (वय 66.रा.रेसकोर्स नाका ताराराणी चौक संभाजीनगर,को) आणि त्या इमारतीचा मालक सर्फराज निसार ताशिलदार (वय38.रा.शाहुनगर ,बेळगाव) यांच्यासह 5 कामगाराबरोबर तेथे खेळत असलेल्या 51 लोकासह 58 जणांना पकडून त्यांच्याकडील असलेली रोख रक्कम एक लाख 20 हजार आणि 55 मोबाईलसह इतर जुगाराचे साहित्य असे एकूण साडे सहा लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर जुगार कायद्यानुसार चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर पोलिस उपनिरीक्षक चेतन मसुटगे पोलिस दिपक घोरपडे,यशवंत कुंभार,वसंत पिंगळे,रामचंद्र कोळी,महेश आंबी,राजू कांबळे,सतीश जंगम सागर चौगुले आणि समीर कांबळे यांनी केली.