जन्म दिलेल्या आईचा खून करून आईचे काळजी खाणाऱ्या मुलाला फाशीच.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : आईकडे दारुसाठी मागणी करुन ही आई दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हटल्यावर संतापलेल्या  मुलगा सुनील रामा कुचकोरवी (वय ३५, रा. माकडवाला वसाहत, कोल्हापूर) याने आई यल्लवा रामा कुचकोरवी (वय ६३) यांचा खून केला. त्यानंतर पोट फाडून काळीज बाहेर काढले व ते भाजून खाल्ले होते. या गंभीर व किळसवाण्या गुन्ह्यातील आरोपी मुलगा सुनील याची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. मंगळवारी न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळला.

२८ ऑगस्ट, २०१७ रोजी आरोपी मुलगा सुनील व त्याची आई यल्लवा यांच्यात घरातच वाद झाला. सुनील आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. मात्र, आई त्याला पैसे देण्यास नकार देत होती. या रागातून सुनीलने धारदार चाकूने आईचा खून केला. त्यानंतर पोट फाडून काळीज बाहेर काढले. तव्यावर फ्राय करून ते खाल्ले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सुनील यास अटक केली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने सुनील याला फाशीची शिक्षा सुनावली होती. पण सुनीलने उच्च न्यायालयात दयेचा अर्ज केला करुन  माझी फाशीची शिक्षा रद्द करावी .आणि त्या ऐवजी  जन्मठेपेची शिक्षा मिळाण्या साठी अर्ज केला होता .या अर्जावर  न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या न्यायालयात अर्जावर सुनावणी झाली. हा खुनाचा गुन्हा अतिशय दुर्मीळ आणि गंभीर असल्याचे मत नोंदवत न्यायालयाने आरोपी सुनील याचा अर्ज फेटाळत फाशीची शिक्षा कायम केली.

--------------

महिलेचे २ लाखांचे दागिने लंपास.

कोल्हापूर : 

मोरेवाडी ते शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर केएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची दागिण्यांची पर्स चोरीला गेली. या पर्समध्ये चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा दोन लाखांचा ऐवज होता. या प्रकरणी सोनाली दिलीप नरके (वय ५६, रा. राजेंद्रनर, कोल्हापूर) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सोनाली नरके व त्यांची सासू या दोघी केएमटी बसमधून कोल्हापूरात येत होेत्या. सव्वा एक वाजता त्या केएमटी बसमधून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे त्या उतरल्या. यावेळी त्याच्याकडील मोठ्या पिशवीतील लहान पर्स लंपास झाल्याचे लक्षात आले.

पर्समध्ये तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्यांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, पाचशे रुपयांची रोकड, मोबाईल असा दोन लाख दोन हजार रुपयांचा ऐवज होता. सोनाली यांनी याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक दिलीप पवार तपास करीत आहेत.

----------

तरुणाचा मृत्यू.

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव  येथील एका लॉजमध्ये ठाणे येथील आशिष पुजाजी खडसे (वय ३५) हा तरुण थांबला होता. मंगळवारी सकाळी बराच वेळ त्याने खोलीचा दरवाजा उघडला नाही.त्यामुळे लॉजमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता तो बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सीपीआर पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post