विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- हातकंणगले तालुक्यातील अंबपवाडी येथील अश्विनी नितीन चव्हाण (वय 27.रा.चव्हाण गल्ली) यांचा रविवार (दि.27) रोजी सायंकाळी साडे चारच्या सुमारास घराच्या मागे असलेल्या जनांवरांच्या गोट्यात गाय धुवत असताना पाण्याचा मोटारीचा शॉक लागून बेशुध्द झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

यातील मयत यांचे माहेर लातुर असून त्यांचे अंबपवाडी येथील नितीन चहाण यांच्याशी विवाह झाला होता.त्यांना दोन लहान मुले आहेत.आज दुपारच्या सुमारास नितीन चव्हाण वैरण आणण्यासाठी गेले होते.घरी मयत अश्विनी यांच्यासह सासू व जाऊ होत्या.अश्विनी घराच्या मागे असलेल्या गोट्यात असलेल्या गाईला प्रेशर मशीनद्वारे पाण्याची  मोटार चालु करून गाईला धुवत असताना शॉक लागल्याचे तिच्या सासूला निदर्शनास आले असता त्यांच्या नातेवाईकांनी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता अश्विनीनीचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

तरुणाची आत्महत्या.

कोल्हापूर- मुक्तसैनिक वसाहत परिसरातील प्रकाश ज्योतिराम केसरकर (वय 30.रा.काटे मळा,सध्या रा.यादववाडी ,पु.शिरोली) याने रविवार (दि.27) रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास रहात असलेल्या घरातील लाकडी वाशाला साडीने गळ्यात गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post