विजेचा शॉक बसून लहान मुलाचा मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- कणेरनगर येथे  घराच्या दारात बनवलेल्या किल्ल्याला लायटिंग करून आकाश कंदील जोडताना अचानक  विजेचा धक्का बसल्याने वेदांत सुधीर झेंडे (वय12) याचा गुरुवार (दि.24) रोजी  मृत्यु झाला.ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  घडली. या घटनेन झेंडे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

    कोल्हापुरातील कणेरकरनगर येथे  सुधीर झेंडे हे आई, पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. सुधीर झेंडे हे बेंगलोर इथल्या एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. पत्नी,आई आणि दोन्ही मुलं कोल्हापुरातच राहतात. त्यांचा थोरला मुलगा पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सहावीच्या वर्गात शिकतो. आज सायंकाळी त्याची आई आणि तो घरी होते. दरम्यान घराच्या दारात उभारलेल्या किल्ल्याला आणि  आकाश कंदीलला  लाइटिंग करीत  असताना त्याला विजेचा धक्का बसला. शेजाऱ्यांनी ही घटना पाहिली असता  त्यांनी वेदांतला शॉक लागल्याचे  त्याच्या आईला सांगितलं. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विशाल इंगवले, अमित अधिक, प्रताप पाटील, जाधवसर यांनी वाहनातून वेदांत झेंडेला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी वेदांतला सीपीआरमध्ये दाखल करण्यास सांगितले.तात्काळ वेदांतला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.



Post a Comment

Previous Post Next Post