अपघातात जखमी झालेल्या इसमाचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- जयसिंगपुर येथील चंदु कुबेर बागडी (वय 53.रा.नांदणी रोड ) यांचा शुक्रवार (दि.11) रोजी मोटारसायकल वरुन जात असताना ते स्वतःच खाली पडून जखमी झाले होते.त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मंगळवार (दि.15) रोजी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की,यातील मयत यांची जयसिंगपुर येथे समर्थ नावाचे चिरमुरे विक्रीचे दुकान आहे.ते शुक्रवारी आपल्या मोटारसायकल वरुन मुरगुडहुन आदमापुरला जात असताना कुरुकली परिसरात गाडी स्लिप झाल्याने ते स्वतःच खाली पडल्याने त्यात जखमी झाले होते.त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना आज त्यांचा मृत्यु झाला.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि चार मुली आहेत.

----------------------------------------

 तरुणाची आत्महत्या.

कोल्हापूर- कदमवाडी येथील अनिकेत विठ्ठल शहापुरे (वय 31) याने मंगळवार (दि.15) रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास रहात असलेल्या घरात बेडरूममध्ये पंख्याला नॉयलॉन दोरीने गळ्यात गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या  गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post