प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- करवीर तालुक्यातील क.बीड येथील साक्षी पंडीत कुंभार (वय 24) या विवाहित तरुणीने दोन दिवसांपूर्वी माहेरी विषारी औषध सेवन केले होते.तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी कोल्हापुर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात होते.तेथे उपचार चालू असताना रविवारी मृत्यु झाला.सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करून सदरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.
---------------------------------------
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.
कोल्हापूर- कनाननगर येथील किरण दत्तात्रय चोपडे (वय 23.रा.विश्वशांती चौक) याने रविवार (दि.13) रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास त्या परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला ओढ़णीने गळ्यात गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
----------------------------------------
विषारी औषध घेतलेल्या वृध्दाचा मृत्यु.
कोल्हापूर- जोशी गल्लीतील रमेश लक्ष्मण पाटील (वय 62.रा.डी वॉर्ड) यांनी सोमवार (दि.07)रोजी रात्रीच्या सुमारास रहात असलेल्या घरात विषारी औषध सेवन केले होते.त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना रविवार (दि.13) रोजी सकाळी अकरा वाजता मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
----------------------------------------
विषारी औषध घेतलेल्या विवाहित महिलेचा मृत्यु .
कोल्हापूर- कागल तालुक्यातील बेलवळे ब्रु.येथील सावित्री विश्वास पाटील (वय 39) यांनी सोमवार (दि.07) रोजी रहात असलेल्या घरात विषारी औषध सेवन केले होते.त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना रविवार (दि.13) रोजी सकाळी पावणे सहा वाजता मृत्यु झाला.सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करून सदरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.