प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- हातकंणगले तालुक्यातील डी.एम.टोळीच्या प्रमुखासह तिघांना कोल्हापूर जिल्ह्यातुन सहा महिन्यासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली.यात डी.एम.टोळीचा प्रमुख दस्तगीर हसन महालिंगपुरे(रा.जवाहरनगर , इंचलकरंजी) याच्यासह त्याचे साथीदार संतोष कृष्णा गोसावी (रा.नवव्वी गल्ली ,जयसिंगपूर ) आणि विलास मिसाळ (रा.कुंभोज ) यांचा समावेश आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारीना गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत हद्दपारीची कारवाई करण्यासाठी त्यांचे प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.या अनुशंगाने गुन्हेगाराची माहिती घेत असताना हातकंणगले तालुक्यात आणि शहरात डी.एम.टोळीच्या वाढ़ती गुन्हेगारी आणि त्याच प्रमाणे समाजात आणि नागरिकांच्यात दहशत निर्माण करून आपला दबदबा निर्माण केल्या प्रकरणी या टोळीच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हातकंणगले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी प्रस्ताव तयार करून मा.पोलिस अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता.या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणुन शाहुवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांची नेमणूक केली होती.सदर प्रस्तावाची चौकशी करून अहवाल पोलिस अधीक्षक यांच्याकडे सादर केला असता.त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन नागरिकांच्यात समाजात सामाजिक बाधा येण्याची शक्यता असल्याने पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी मंगळवार (दि.29) रोजी या तिघांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातुन सहा महिन्यासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली.