प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- पन्हाळा तालुक्यातील कुशीरे पोहाळे तर्फ आळते येथील गजानन खंडेराव पाटील (वय 56.रा.पाटील गल्ली) यांचा रविवार (दि.27) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास शेतातून भाताचा भारा डोक्यावरून घेऊन येत असताना बांधावरुन पाय घसरून पडल्याने बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत यांच्या शेतात भात कापणी चालू होती. भाताचा भारा डोक्यावरून घेऊन घरी परत येत होते. त्या परिसरात चिखल असल्याने बांधावरुन येत असताना पाय घसरून खाली पडले.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि दोन मुले आहेत.