प्रेस मीडिया लाईव्ह :
खुली महिला व कामगार पुरुष भजन स्पधेर्ची पुर्वतयारी दोन दिवस अगोदर करण्यात आली. तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहूणे यांना निमंत्रणे देण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर निमंत्रित पाहुणे व परिक्षक यांचे हस्ते विठ्ठल रुक्मिणी व महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित स्वागत विजय शिंगाडे, कामगार कल्याण अधिकारी यांनी केले. खुल्या महिला भजन व कामगार पुरुष भजन स्पर्धेत राजारामपुरी, बिंदुचौक, संभाजीनगर, सागरमाळ, फुलेवाडी, कागल, इचलकरंजी व वारणानगर अशा एकूण ०८ संघानी भाग घेतला.भजन स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभा प्रसंगी बोलताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे मा.डॉ.अमिल कोडोलीकर, अध्यक्ष, कोल्हापुर मेडिकल असोसिएशन यांनी स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने महिला व विविध आस्थापनेत काम करणार््या कामगारांना भजनाच्या माध्यमातुन एक चांगले व्यासपिठ मिळवुन देण्याची संधी देण्याचे चांगले कार्य महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ करीत आहे असे गौरवोद्गार काढले. तसेच महिलांना व कामगारांना कला क्षेत्रात काम करण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
तदनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.शिवराज जाधव, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापुर यांनी मंडळाने महिलांची खुली व कामगार पुरुष यांची भजन स्पर्धा भरवुन कामगारांना व्यसनाधिनतेपासुन दुर ठेवण्यासाठी व महिलांना त्यांच्या व्यस्त संसारिक जीवनातुन भजन स्पर्धेच्या माध्यमातुन कला क्षेत्रात आपली छाप उमटवणयाची होण्याची संधी दिली आहे अशी भावना व्यक्त केली व मंडळाच्या कार्यक्रमांचे विशेष कौतुक केले. तसेच भजनाच्या माध्यमातुन महिलांना व पुरुषांना ताणतणावांपासुन दुर ठेवण्याचे व त्यांचे मानसिक आरोग्य ठेवण्याचे एक चांगले कार्य महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ करीत आहे असे नमुद केले.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा.श्री.सुरेश केसरकर, अध्यक्ष, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांनी मंडळाने या स्पर्धा खासकरुन कामगार पुरुष व महिलांसाठी राबविल्या जातात याबद्दल मंडळाचे आभार मानुन, महिलांनी प्रापंचिक कार्य पार पाडताना स्वतःबरोबर समाजाचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असुन आपला सामाजिक व सांस्कृतिक विकास करुन घेण्यासाठी मंडळाच्या सोबतीने कार्य करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा.श्री.सजे्राव हळदकर, कार्याध्यक्ष, कोल्हापुर जिल्हा साखर कामगार समन्वय समिती यांनी मंडळाने या स्पर्धा आयोजित करुन समाजासमोर एक चांगल्या निरोगी भावी पिढीसाठी आदर्शवत ठराव्यात याप्रमाणे आयोजित केल्या. मंडळाने विविध आस्थापनेतील संघ तयार करुन त्यांचे समाजमान उंचावण्याचे काम ही या स्पर्धांव्दारे केले असल्याचे प्रतिपादन केले. विशेष करुन मंडळाचे कर्मचारी मंडळाचे कार्य मोठ्या प्रमाणात होण्याकरीता अविरत वेळेची तमा न बाळगता करतात याबाबत संबधीत कर्मचारी यांचे.आपल्या मनोगतातुन कौतुक केले.
मान्यवर परीक्षक मा.प्रदिप कुलकर्णी, यांनी आपल्या मनोगतात स्पर्धेदरम्यान भजन कलाकारांनी केलेल्या चुका व भविष्यात स्पर्धेत उतरताना भजनाची करावयाची तयारी व भजनाचे नियम पाळुन भजन कसे सादर करावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र ठरलेल्या संघाला मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचे सुज्ञ परीक्षण मा.प्रदिप कुलकर्णी, मा.सतिश पाटील, मा.अश्विनी जोशी यांनी केले. यावेळी निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही स्पर्धेच्या विजयी संघाना व कलाकारांना सांघिक तालसंचनासह वैयक्तीक तबला वादन, गायक व पेटीवादन याकरीता रोख रक्कमेची पारीतोषिके, सहभागाचे व विजयी क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तत्पुर्वी निमंत्रित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक श्री.विजय शिंगाडे, कामगार कल्याण अधिकारी, गट कार्यालय, कोल्हापुर यांनी केले. या कार्यक्रमांस मा.अनिता काळे, गुणवंत कामगार यांचे सह सर्वश्री गुणवंत कामगार मा.अनिल शिंदे, संभाजी थोरात, बाबा ढेरे, संजय सासने, शिवाजी चौगले, सुरेश पोवार तसेच विविध आस्थापंनांतील एच.आर. अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन विजय शिंगाडे, कामगार कल्याण अधिकारी, कोल्हापुर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन शिंगाडे, कनिष्ठ लिपिक, राजेंद्र निकम, कल्याण निरीक्षक, सचिन आवळेकर केंद्र संचालक, सचिन खराडे, केंद्र संचालक,चंद्रकांत घारगे, सहाय्यक केंद्र संचालक, दिपक गांवराखे सहाय्यक केंद्र संचालक, यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन दिपक गांवराखे सहाय्यक केंद्र संचालक, यांनी आभार राजेंद्र निकम, कल्याण निरीक्षक, यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्याकरीता विजय खराडे, अशोक कौलगी, शाहीन चौगले मंगल बेळगांवकर, लता कांबळे,सुजाता कलकुटकी, अक्षया माने, सुचित्रा चव्हाण, स्वाती वायचळ, सुजाता बुधले, जयश्री मोरे, श्वेतल सुतार यांनी परिश्रम घेतले.
खुली महिला व कामगार पुरुष स्पर्धेचा संपुर्ण निकाल तपशिलवार खालील प्रमाणे......
विजयी संघः खुली महिला भजन स्पर्धा
प्रथम क्रमांक: कामगार कल्याण भवन, इचलकरंजी.
व्दितिय क्रमांक: कामगार कल्याण केंद्र, बिंदुचौक, कोल्हापुर.
तृतिय क्रमांक: कामगार कल्याण केंद्र, सागरमाळ, कोल्हापुर.
उत्कृष्ठ महिला तबला वादक:
प्रथम क्रमांक: सायली सावंत,
व्दितिय क्रमांक: प्रति मिरजकर
तृतिय क्रमांक: वैष्णवी सुतार
उत्कृष्ठ महिला गायिका:
प्रथम क्रमांक: स्वप्नाली सुतार
व्दितिय क्रमांक: दिपमाला जाधव
तृतिय क्रमांक: किर्ती देशपांडे
उत्कृष्ठ महिला पेटीवादक :
प्रथम क्रमांक: वैजयंती हसुरे
व्दितिय क्रमांक: संगीता हावळ
तृतिय क्रमांक: सिमा खटावकर
उत्कृष्ठ तालसंचन:
प्रथम क्रमांक: कामगार कल्याण केंद्र, वारणानगर.
व्दितिय क्रमांक: कामगार कल्याण केंद्र, संभाजीनगर, कोल्हापुर.
तृतिय क्रमांक: कामगार कल्याण भवन, इचलकरंजी.
विजयी संघः कामगार पुरुष भजन स्पर्धा
प्रथम क्रमांक: कामगार कल्याण भवन, इचलकरंजी.
व्दितिय क्रमांक: कामगार कल्याण केंद्र, बिंदुचौक, कोल्हापुर.
तृतिय क्रमांक: कामगार कल्याण केंद्र, सागरमाळ, कोल्हापुर.
उत्कृष्ठ गायक:
प्रथम क्रमांक: बाजीराव चौगले
व्दितिय क्रमांक: सुर्यकांत शिंदे
तृतिय क्रमांक: संजय भगवे
उत्कृष्ठ तबला वादक :
प्रथम क्रमांक: विशाल सुर्वे
व्दितिय क्रमांक: ज्ञानेश कोळी
तृतिय क्रमांक: कृष्णात माळवदे
उत्कृष्ठ पेटीवादक :
प्रथम क्रमांक: नागेश पाटील
व्दितिय क्रमांक: मारुती कांबळे
तृतिय क्रमांक: अजय ऐतवडेकर
उत्कृष्ठ तालसंचन:
प्रथम क्रमांक: कामगार कल्याण केंद्र, बिंदुचौक, कोल्हापुर
व्दितिय क्रमांक: कामगार कल्याण भवन, इचलकरंजी
तृतिय क्रमांक: कामगार कल्याण केंद्र, कागल.