प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारुची वाहतूक करण्यारया चेतन भरत वाळवे , तुषार तुकाराम वाळवे (दोघे रा.वाळवेकरवाडी कणकवली),शहाबाज अब्दुल गोरे (रा.मुस्लिमवाडी ,कुडाळ) आणि फारुख दस्तगीर जमादार (नाळे कॉलनी संभाजीनगर,को.) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्या कडुन 38 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरोधात शाहुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात होत असलेली बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारुची वाहतूक याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारीना आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिल्या होत्या.या अनुशंगाने गोवा बनावटीची वाहतूकीची माहिती घेत असताना पोलिस रेकॉर्ड वरील चेतन भरत वाळवे हा आपल्या साथीदारांसह आंबा येथुन पांढ़री स्विफ्ट गाडी आणि आयशर टेम्पोतुन गोवा बनावटीची दारू घेऊन कोल्हापुरच्या दिशेने येणार असल्याची माहिती मिळाली असता शुक्रवार (दि.11) रोजी रात्रीच्या सुमारास त्या परिसरात सापळा रचून आंबा घाटाकडुन कोल्हापूरच्या दिशेने येत असलेली पांढ़रया कलरची स्विफ्ट गाडी(क्र.एमएच -4-एफ एफ-9714)आणि आयशर टेम्पो(क्र.एमएच-07-एजे-3599) ही वाहने येत असताना दिसली असता ती जवळ येताच थांबवून त्या वाहनाची झडती घेतली असता त्यात 500 बॉक्स आढ़ळुन आले त्यात रॉयल ब्लु कंपनीची गोवा बनावटीची दारू 180 मि.चे 48 बाटल्या मिळुन आल्या.सदरचा माल बेकायदेशीर असल्याने हा 24 लाखांचा मुद्देमाल व 10 लाख रुपये किमंतीचा आयशर टेम्पो आणि 4 लाख रुपये किमंतीची स्विफ्ट कार असा एकूण 38 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरोधात शाहुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस रेकॉर्डवरील चेतन भरत वाळवे याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात एक आणि सावंतवाडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हें दाखल आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस सुरेश पाटील,रामचंद्र कोळी,रुपेश माने,वैभव जाधव आणि विनोद कांबळे आदीनी केली.