नेर्ले फाटा झालेल्या रोड अपघातात दोघां जखमी पैकी आज एकाचा मृत्यु , तर एका जखमीवर उपचार चालू.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- इंचलकरंजी येथील सागर दिलीप लाखे (वय 19.रा.लालनगर इंचलकरंजी) आणि प्रेम विठ्ठल जावळे (वय 20) या दोघांचा  रविवार (दि.20) रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास नेर्ले फाटा येथे झालेल्या रोड अपघातात जखमी झाले होता.त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी सागर लाखे याला  उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना मंगळवारी सकाळी सागर याचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की,इंचलकरंजी येथील सागर लाखे आणि त्याचा मित्र प्रेम हे दोघे मोटारसायकल वरुन औंध येथे लग्नाला जात असताना नेर्ले फाटा येथे एका वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली .त्यात ते दोघे ही मोटारसायकल वरुन खाली पडले .जखमीना तेथील नागरिकांनी रुग्णवाहिकेतुन इस्लामपुर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघाताची माहिती कासेगाव पोलिसांना समजताच पोलिस घटना स्थळी जाऊन अपघाताची माहिती घेत जखमीच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली.त्याचे नातेवाईक तात्काळ इस्लामपुर येथील खाजगी रुग्णालयात जाऊन जखमीना पुढ़ील उपचारासाठी रुग्णवाहिकेतुन सागरला  सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .सागर याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार चालू असताना मंगळवारी सकाळी  मृत्यु झाला.तर जखमी प्रेम विठ्ठल जावळे यांच्यावर इंचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचार चालू आहेत.सागर आणि प्रेम हे दोघेही हमाली काम करीत होते.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.सागर यांच्या पश्च्यात आई वडील आणि दोन लहान भाऊ आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post