प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील गिरगाव येथे रहात असलेले बाळु श्रीपती माने (वय 68) यांचा गुरुवार (दि.24) रोजी साडे दहाच्या सुमारास द.वडगाव येथे असलेल्या तलावात पाण्यात तरंगताना मिळुन आला असता त्यांना पाण्याबाहेर काढ़ुन बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत यांचे गावात सलुनचे दुकान असून ते आणि त्यांचा मुलगा चालवित होते.काल पासून ते घरातुन बाहेर पडले होते.आज सकाळी द.वडगाव येथील तलावात वैरणी साठी गेलेल्या लोकांना त्यांचा मृतदेह तरंगताना आढ़ळला असता याची माहिती त्या गावच्या पोलिस पाटील यांना देण्यात आली.त्यांनी मयत यांच्या नातेवाईकांना दिली.त्यांचे नातेवाईक तात्काळ घटना स्थळी जाऊन त्यांना पाण्याबाहेर काढ़ुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यु झाला.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि दोन मुले आहेत.