मोटारसायकल वरुन पडल्याने महिलेचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-कागल तालुक्यातील चौंडाळ येथील शुभांगी बाळासो पाटील (वय 37) याचा शनिवार (दि.05) रोजी केनवडे फाटा येथे झालेल्या अपघातात जखमी झाल्या होत्या.त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.पुढ़ील उपचारासाठी सोमवार (दि.07) रोजी सायंकाळच्या सुमारास सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की यातील मयत या आपल्या मुलासमवेत मोटारसायकल वरुन लाडक्या बहिणीचे पैसे आणण्यासाठी गेल्या होत्या.परत येत असताना टर्न घेत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन खाली पडल्याने त्यात जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल करून पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यु झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांचे पती तेथेच डेअरीत नोकरीस आहेत.त्यांच्या पश्च्यात पती,एक विवाहीत मुलगी आणि एक मुलगा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post