तरुणाची आत्महत्या.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- फुलेवाडी येथील योगेश भागोजी लांबोरे (वय 28.रा.रिंगरोड ,फुलेवाडी) याने शनिवार (दि.19) रोजी रात्रीच्या सुमारास रहात असलेल्या घरातील बेडरूममध्ये सिंलिंग पंख्याला साडीने गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस ठाण्यात झाली आहे.

यातील मयत योगेश हा साने गुरुजी येथील  बँकेत शिपाई म्हणून नोकरीस होता. नेहमी  कामावरुन आल्या नंतर आपल्या बेडरुम मध्ये जाऊन  बँकेची कामे करत असत .नेहमी प्रमाणे शनिवारी कामावरुन येऊन आपल्या बेडरुम मध्ये गेले बराच वेळ खाली न आल्याने त्याची पत्नी बोलवण्यास गेल्या असता वरील प्रकार उघडकीस आला.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्याच्या पश्च्यात आई,भाऊ ,पत्नी आणि सव्वा वर्षाची  मुलगी आहे .त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post