प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -हातकणंगले येथे रहात असलेला नवनाथ बाळासाहेब चोरमुले (वय २३ रा. धनगर गल्ली ,तळंदगे )या युवकाला मंगळवार (दि.01) रोजी रात्री नऊच्या सुमारास नवनाथ याच्यावर जीवघेणा हल्ला करुन मारहाण केली होती. या घटनेची फिर्याद नवनाथ याची आई आक्काताई बाळासाहेब चोरमुले यांनी गोकुळ शिरगाव पोलीसात दिली.
अधिक माहिती अशी की,पट्टणकोडोली येथील पप्पू उर्फ आशुतोष जाधव आणि चिकण्या उर्फ प्रथमेश बाजीराव दाईंगडे (रा तळंदगे ) यांच्यात आणि जखमी नवनाथ यांच्यात एकमेकांना खुन्नस देत असल्याच्या कारणावरून वाद झाला होता त्यामुळेच त्यांनी त्यांचा काटा काढण्यासाठी मारहाण केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यातील अद्याप यातील संशयित पसार झाले असून गोकुळ शिरगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथुन मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास नवनाथ चोरमुले हा घरी येत असताना याच वेळी दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत नवनाथ याच्या कानाच्या वरील भागावर व तोंडाच्या जबड्यावर धारदार कोयत्याने जबरी वार केला.