प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-करवीर तालुक्यातील उचगाव येथील ट्रक ड्रायव्हर राहुल दिलीप कांबळे (वय ३९) याने बुधवार (दि.09) रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास राहत्या घरी छताच्या लोखंडी पाईपला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला त्याच्या नातेवाईकांनी गळफास सोडवून त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. राहुल हा अविवाहित होता. दारुच्या नशेत त्याने आत्महत्या केली असल्याची शक्यता गांधीनगर पोलीसांनी व्यक्त केली आहे.
Tags
कोल्हापूर