विषारी औषध घेतलेल्या कॉलेज तरुणाचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- भुदरगड तालुक्यातील नवले येथील शुभम  दशरथ पाटील (वय 19 ) याने मंगळवार (दि.29) रोजी रात्री साडे आठच्या सुमारास रहात असलेल्या घरात हमला नावाचे विषारी औषध सेवन केले होते.त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी कडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले होते.तेथुन  उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते.तेथे उपचार चालू असताना गुरुवार (दि.31) रोजी सकाळी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

यातील मयत हा कडगाव येथे आबिटकर कॉलेजात इंजिनिअरींगला जात होता.त्याचे वडील शेती करीत असून शुभम हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.त्याच्या पश्च्यात आई वडील आणि दोन बहिणी आहेत.त्याच्या अशा प्रकारे मृत्यु मुळे पाटील कुंटुबियाना मोठा धक्का बसला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post