प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- करवीर तालुक्यातील गिरगांव येथे रहात असलेला निवास विलास जाधव (वय 29.रा.महादेव मंदीर,गिरगांव) याने शनिवार (दि.26) रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास रहात असलेल्या घरातील तुळईला कापडी दोरीने गळ्यात गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हा आई,विवाहित भाऊ यांच्या बरोबर रहात असून तो मिळेल ते काम करीत होता.त्याचा भाऊ खाजगी ड्रायव्हर म्हणुन काम करीत असून त्याचे लग्न झाले होते.मात्र मयत निवास याचे लग्न ठरत नसल्याने तो नाराज होता.रहात असलेल्या गल्लीत त्याचे दोन घरं असल्याने तो रहात असलेल्या घरात त्याची त्याला बोलविण्यासाठी गेली असता वरील प्रकार उघडकीस आली.या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.