प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- कोकेनची विक्री करणारा शेअर मार्केटर विशाल तांबडे (रा.ग्र्य्ंड रोड ,मुंबई,मुळगाव रायगड कॉलनी,पाचगाव) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 तारखे प्रर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की गुरुवार (दि.10) रोजी जिल्हा परिषद परिसरात असलेल्या नागाळा पार्क येथे विक्री साठी आलेल्या निलेश राजेंद्र जाधव (रा.जुना बुधवार पेठ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्याच्या कडील 20 लाख रुपये किमंतीचे 133gm.कोकेन जप्त करून त्याच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 तारखे प्रर्यत पोलिस कोठडी सुनावली होती.सदर मुदतीत जप्त केलेले कोकेन हा अंमली पदार्थ कोठून आणला याचा तपास त्याच्याकडे केला असता त्याने मुंबई येथील विशाल तांबडे याच्या कडुन विक्री साठी घेतल्याचे पोलिसांना सांगितले असता विशाल तांबडे याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे यांचे पथक मुंबईला रवाना झाले होते.सदर आरोपीचा शोध घेऊन विशाल तांबडे याला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्याला 14 तारखेप्रर्यत पोलिस कोठडी मिळाली आहे.
जप्त केलेले कोकेन हा अंमली पदार्थ कोठून आणला याबाबत त्याच्याकडे तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.