प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- लक्ष्मीपुरी पोलिसांनी तिघां मोटारसायकल चोरट्यांना अटक करून त्यांच्या कडील पाच लाख पंचवीस हजार रुपये किमंतीच्या 14 मोटारसायकल जप्त करून त्यांना न्यायालयात हजर केले असता 11 तारखेप्रर्यत पोलिस कोठडी मिळाली आहे.यात स्वप्निल सुभाष महाजन (वय 27.रा.माणगांव) ,किशोर कुमार भाट (वय 27.रा.गांधी चौक,माणगांव)आणि सनी संजय कोळी (वय 28.रा.जैन बस्ती माणगांव) यांचा समावेश आहे.
अधिक माहिती अशी की,सोमवार (दि.07) रोजी सीपीआर आवारातुन रणजीत प्रेमनाथ कांबळे (वय 31.आपटेनगर) याची (MH-09-BT-8964) ही मोटारसायकलीची चोरी झाली होती.याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना आणि पोलिस कर्मचारी यांना मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुशंगाने माहिती घेऊन शोध घेत असताना मंगळवार (दि.08) रोजी शिवाजी पूल ते सिध्दार्थनगर मार्गावर विना नंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी इचलकरंजीसह सांगली आणि कर्नाटकातील उगार ,कुडची येथुन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पाच लाख पंचवीस हजार रुपये किमंतीच्या 14 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.दिलीप पवार पोलिस प्रितम मिठारी,गजानन परिट ,तानाजी दावणे आणि मंगेश माने यांनी केली.