तीन संशयीत अल्पवयीन मुले शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - किरकोळ कारणातुन झालेल्या मारहाणीत अविनाश तुकाराम नलवडे (वय 25.रा.पिंजारगल्ली ,क.बावडा) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू होते.तेथे उपचार चालू असताना गुरुवार (दि.31) रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत आणि त्या परिसरातील मुलांशी गुरुवार (दि.24) रोजी त्याच्या रहात्या घरासमोर किरकोळ कारणातुन वाद झाला होता.या वादातुन संशयीतानी अविनाश याचे दगडाने डोके फोडल्याने त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते.त्याच्या डोक्याला बारा टाके पडल्याने त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू होते.तेथे उपचार चालू असताना त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती शाहुपुरी पोलिसांना समजताच मारहाण केलेल्या संशयीत अल्पवयीन तिघां मुलांना शाहुपुरी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
यातील मयत हा आई वडीलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्च्यात आई वडील आणि एक बहिण आहे.