विक्री साठी आलेल्या इसमाकडुन गावटी पिस्टल जप्त.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- बेकायदेशीर हत्यार बाळगून विक्री साठी आलेल्या कृष्णा सुरेश कलकुटगी (वय 38.रा.खुपीरे ,ता.करवीर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्याच्या कडील एक गावटी बनावटीची पिस्टल , तीन जिवंत राऊंड व मोटारसायकल असा एक लाख 50 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी अवैद्य हत्यार बाळगून विक्री करण्यारयाची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या.त्या अनुशंगाने तपास करीत असताना खुपीरे येथील कृष्णा कलकुटगी हा दोनवडे फाटा येथे असलेल्या विटभट्टी जवळ गावटी बनावटीचे पिस्टल विक्री साठी येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल ,3 राऊंड व मोटारसायकल मिळुन आल्याने ती जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post