प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- लोणार वसाहत येथे पाण्याच्या टाकीत खेळत खेळत पडल्याने तैमुर शाहरुख मुल्ला (वय 1 वर्षे 8महिने रा.जलधारा सिमेंट कारखाना लोणार वसाहत) याचा रविवार (दि.06) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास जलधारा सिमेंट कारखान्यात असलेल्या पाण्याच्या टाकीत पडल्याने त्याचा नातेवाईकांनी पाण्याबाहेर काढ़ुन उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,मुळचे पट्टणकोडोली येथील शाहरुख दस्तगीर मुल्ला हे लोणार वसाहत येथे असलेल्या जलधारा सिमेट कारखान्यात गेल्या दोन वर्षांपासून आपल्या कुंटुबिया समवेत रहात असून त्यांना दोन लहान मुले आहेत.ते त्याच कारखान्यात वॉचमन आणि कामाला आहेत.आज सकाळी सातच्या सुमारास सिमेटचा पाइपचा ट्रक आल्याने तो उतरण्यासाठी पती पत्नी कारखान्याच्या पाठीमागे असलेल्या जागेत गेले असता त्यांच्या पाठोपाठ तैमुर ही गेला होता.त्याला त्याच्या नातेवाईकांनी परत घरी आणुन सोडले होते सर्वाची नजर चुकवून गेल्याने खेळत खेळत त्या पाण्याच्या टाकीत पडल्याने काही वेळातच पाण्यात तरंगताना त्याच्या नातेवाईकांना आढ़ळला .त्याला तात्काळ पाण्याबाहेर काढ़ुन बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.आज रविवार असल्याने कारखान्याला सुट्टी होती.त्यामुळे या वेळेस कुणी कामगार नसल्याचे सांगितले.