पुणे-बेंगलोर महामार्गावर 4 लाख रुपये किमंतीचा गुटखा जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- पुणे -बेंगलोर महामार्गावरील गांधीनगर उड्डाणपुलावर गुटख्यांची वाहतूक करणारा टेम्पो पकडून टेम्पो चालक रावत दुंडाप्पा उकली (वय 42.रा.आयडीएल स्कुलच्या पाठीमागे,शहापूर ता.हातकंणगले) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्या कडुन 4 लाख रुपये किमंतीचा गुटखा आणि टेम्पो असा एकूण 7 लाख 19 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापुर शहरात आणि जिल्हयात सुरु असलेल्या अवैद्य व्यवसायाची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिल्या होत्या.त्या अनुशंगाने तपास करीत असताना सोमवार दि.(07) रोजी पुणे-बेंगलोर महामार्गावर अवैद्य गुटख्यांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून मारुती सुझुकी कंपनीचा टेम्पो ( नं.MH-09- EM-3950) हा अडवून त्याच्या चालकाकडे विचारणा केली असता प्रथम त्याने उडवा उडवीची उतरे दिल्याने पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यात चार लाख रुपये किमंतीचा गुटखा मिळुन आल्याने तो टेम्पोसह जप्त करून त्याच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढ़ील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस कृष्णात पिंगळे,सागर चौगुले,यशवंत जाधव,लखनसिंह पाटील आणि शुभम संकपाळ यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post