प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- करवीर तालुक्यातील आसुर्ले येथील संदिप रामराव लोहार (वय 41) यांचा रविवार (दि.13) रोजी दुपारच्या सुमारास लाईटच्या पोल वरुन पडून जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचार चालु असताना सोमवार (दि.14)रोजी सकाळी आठच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,संदिप हा खाजगी इलेक्ट्रीकची काम करीत असतात. रविवारी नागाळा पार्क येथे असलेल्या हरिपुजा अपार्टमेंट मध्ये असलेल्या लाईटच्या पोल वरील बल्ब बदलत असताना अचानक पोल वरुन पडून जखमी झाल्याने त्या अपार्टमेट मधील नागरिकांनी जखमी संदिपला सीपीआर रुग्णालयात दाखल करून त्यांच्या नातेवाईकाला या घटनेची माहिती दिली.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात आई वडील, भाऊ ,पत्नी आणि दोन लहान मुले आहेत.