प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- निपाणी ते मुरगुड या मार्गावर असलेल्या कुंभार चौकात गुटख्याची वाहतूक करणारा दत्तात्रय शिवाजी राणे (वय 34.रा.सोनारवाडी ता.भुदरगड ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्या कडील 76 हजार रुपये किमंतीचा गुटखा आणि टेम्पो असा दोन लाख एक्कावन्न हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरोधात मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढ़ील तपासासाठी मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात अवैद्य व्यवसायाची माहिती घेऊन त्या उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिल्या होत्या.त्या अनुशंगाने अवैद्य व्यवसायाची माहिती घेऊन तपास करीत असताना बुधवार (दि.09) रोजी निपाणी ते मुरगुड मार्गावरील कुंभार चौक परिसरात अवैद्यरित्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून गुटख्याची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा आयरिश टेम्पो (क्र. MH-09-CM- 5629) पोलिसांनी अडवून ड्रायव्हरकडे विचारणा केली असता त्याने उडवा उडवी केली.पोलिसांनी त्या टेम्पोची झडती घेतली असता 76 हजार रुपये किमंतीचा गुटखा मिळुन आला असता टेम्पोसह दोन लाख 51 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर पोलिस उपनिरीक्षक चेतन मसुटगे ,पोलिस योगेश गोसावी ,वैभव पाटील,प्रविण पाटील यांच्यासह आदीने केली.