तलवारीचा मोबाईलवर स्टेटस ठेवल्या प्रकरणी दोघांना अटक.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- मोबाईलवर तलवारीचा स्टेटस ठेऊन दहशत माजविणारया अक्षय संजय मिसाळ (वय.28)आणि स्वप्निल दत्तात्रय जाधव (वय24.दोघे रा.यवलुज ता.पन्हाळा) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडून तलवार आणि इतर साहित्य असा एकूण 52 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अवैद्य हत्यार बाळगून विक्री करण्यारया  इसमाची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या. या अनुशंगाने माहिती घेत असताना यवलूज येथील दोघां जणांनी तलवारीचा स्टेटस ठेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली .तसेच स्टेटसला ठेवलेली तलवार ही मोटारसायकलला अडकवून दसरा चौकात येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील तलवार आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक जालिंदर जाधव, ,पोलिस युवराज पाटील,सुरेश पाटील यांच्यासह आदीने केली.

Post a Comment

Previous Post Next Post