मोठी बातमी : वीस लाख रुपये किमंतीचे कोकेन जप्त.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-  विक्री साठी कोकेन हा अंमली पदार्थ आलेल्या  स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने निलेश राजेंद्र जाधव (रा.2689 डी वॉर्ड जुना बुधवार पेठ) याला ताब्यात घेऊन त्याच्या कडुन वीस लाख रुपये किमंतीचे 133 gm. कोकेन जप्त करून त्याच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता कोकेन हा अंमली पदार्थ मुंबई येथुन विक्री साठी आणल्याची माहिती पोलिसांना दिली.पुढ़ील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे करीत आहेत .

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलिस प्रभारीना आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला अंमली पदार्थांचा साठा करून त्याची विक्री करीत असलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्या कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुशंगाने अंमली पदार्थांची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला गुरुवार (दि.10) रोजी जिल्हा परिषद येथे नागाळा पार्क परिसरात एक इसम कोकेन हा अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात छापा टाकला असता एक इसम संशयीतरित्या रस्त्याच्या कडेला थांबलेला दिसला.त्याला ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 11 लाख 95 हजार रुपये किमंतीचा 133gm. वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ आणि 25 हजाराचा मोबाईल असा एकूण 20 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस विनायक चौगुले,प्रकाश पाटील,अमित सर्जे ,अशोक पाटील,सुजित पवार ,वैभव जाधव आदीनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post