प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील निगवे येथील अर्जुन दिनकर शेलार (वय 55) यांनी स्वतःच एका पायाला व हाताला बांधुन गावात असलेल्या तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून ते बेपत्ता झाले होते.बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह फुगून वरती तरंगताना तेथील नागरिकांच्या निदर्शनास आला.ही माहिती करवीर पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन मयताची माहिती घेऊन सदरचा मृतदेह पाण्याबाहेर काढ़ुन उत्तरीय तपासणी साठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात हलविण्यात येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले.
या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.