प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- गोकुळ शिरगाव येथे शुक्रवार(दि.25) रात्रीच्या सुमारास बेळगावहुन मुंबईकडे जात असलेल्या खाजगी ट्रॅव्हलला लागलेल्या आगीत गजानन यल्लाप्पा जाधव (वय 48.रा.रामदुर्ग ,जि.बेळगाव) यांचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
अधिक माहिती अशी की,यातील मयत हे रामदुर्ग येथे रहात असून ते मुंबई येथे शिकण्यासाठी असलेल्या मुलीला आणण्यासाठी बेळगाव येथुन मुंबईकडे जात असलेल्या खाजगी ट्रॅव्हलने जात होते.गोकुळ शिरगाव येथील महेंद्र शोरुम ट्रॅव्हल आली असता अचानक लागलेल्या आगीने गाडीने पेट घेतला.त्यातील प्रवाशी आरडा ओरडा करीत कसेतरी सर्व प्रवाशी खाली उतरले.मात्र गजानन जाधव यांना गाढ़ झोप लागल्याने त्यांना काही प्रवाशांनी हलवून उठवायचा प्रयत्न करत होते पण ते उठले नसल्याने त्या आगीत त्यांचा होळपळुन मृत्यु झाला.या घटनेची माहिती गोकुळ शिरगाव पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केला.शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.गजानन जाधव हे रामदुर्ग येथे एका पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणुन काम करीत होते.त्यांच्या पश्च्यात आई,पत्नी ,दोन मुली आणि एक मुलगा आहे.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.