कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह तिघांची तडका फडकी बदली.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-  एका खून प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक युनुस इमानदार यांची नियंत्रण विभागाकडे बदली केली असून विलास तळसकर आणि सुभाष सरवडेकर यांची पोलिस मुख्यालय येथे बदलीचा आदेश पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी काढ़ला.हणमंतवाडी येथे झालेल्या एका प्रकारातील संशयीताना वाचविण्याचा प्रर्यत्न केल्याचा प्रकार घडला होता.याचा तपास गडहिग्लजचे पोलिस उपअधीक्षक राजीव नवले हे तपास करीत  असून त्याचा अहवाल  आल्यानंतरच पुढ़ील कारवाई होणार असल्याचे पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी सांगितले.

करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे प्रॉपर्टीच्या वादातुन एकाचा खून झाला होता.या प्रकरणी करवीर पोलिसांनी दोघां संशयीताना अटक केली होती.मात्र या खून प्रकरणातील काही संशयीतांची नावे वगळल्याचा आरोप  ग्रामस्थांनी केला असून त्यात आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.याची कुणकुण करवीर पोलिसांना लागताच करवीर पोलिसांनी आणखी काही संशयीतांना अटक करून त्यांची नावे वाढ़विली.या प्रकरणाची पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दखल घेऊन या खून प्रकरणातील तपास अधिकारी उपनिरीक्षक युनुस इमानदार यांच्यासह सरवडेकर व तळसकर यांची तडका फडकी बदली केली.

गेल्या महिन्यात हणमंतवाडी येथे मालमत्तेच्या वादातून झालेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा खून झाला होता. त्या घटनेतील दोन संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना करवीर पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, त्या गुन्ह्यातील काही संशयितांची नावे वगळून करवीर पोलिसांनी आर्थिक व्यवहार केल्याची तक्रार ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे केली. याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच पोलिसांनी आणखी काही संशयितांना अटक करून फिर्यादीत त्यांची नावे वाढवली.

पोलिस अधीक्षक पंडित यांनी याची गंभीर्याने दखल घेऊन तपास अधिकारी उपनिरीक्षक युनुस इनामदार यांना नियंत्रण कक्षात संलग्न केले, तर अंमलदार तळसकर आणि सरवडेकर यांना पोलिस मुख्यालयात संलग्न केले. गडहिंग्लज येथील उपअधीक्षक राजीव नवले यांच्याकडून तिघांची चौकशी होणार आहे. चौकशीचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post