मोपेडच्या डिकीतुन दीड लांख रुपयांची रोकड लंपास.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापूर- गजबजलेल्या  टाऊन हॉल परिसरात उभ्या  केलेल्या मोपेडच्या  डिकीतुन दीड लाख रुपयांची रक्कम चोरट्याने लंपास केली. ही घटना शुक्रवार (१८) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडली असून याची फिर्याद  मानसी अवधूत जोशी (वय ३८ रा. मंगळवारपेठ ,कोल्हापूर) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

      आपल्या मोपेडवरून मानसी जोशी या  खानविलकर पेट्रोल पंपापासून टाऊन हॉल परिसरात असलेल्या  पुराभिलेख कार्यालयाच्या आतील बाजूस स्टॅप घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी आपल्या मोपेडच्या  डिकीत दीड लाख रुपयांची रोकड ठेवली होती. स्टॅप घेऊन परत मानसी जोशी या  खानिकवलकर पेट्रोल पंपाजवळ गेल्या तेव्हा त्यांनी दुचाकीची डिकी उघडून पाहिली. तेव्हा त्यामध्ये दीड लाख रुपये ठेवलेली पर्स नसल्याचे आढ़ळले .

   त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. मात्र पैसे सापडले नाहीत. रात्री आठ वाजता त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक अज्ञात चोरटा डिकी उघडून रोकड चोरून नेत असल्याचे दिसून आले. याचा तपास हेड कॉन्स्टेबल कोळी करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post