प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -गर्दीचा फायदा घेऊन महिलांची पर्स चोरणारया माधवी विकास लोंढ़े(वय 20.रा.शाहुनगर बेघर,कागल) अनिता सुहास लोंढ़े(वय40.रा.शाहुनगर बेघर ,कागल) रेखा विजय सकट (वय 55.रा.गडहिग्लज) मंदा संतोष लोंढ़े (वय40.रा.राजेंद्रनगर) रुपा संतोष घोलप (वय45.रा.राजेंद्रनगर)आणि आरती हरि चौगुले (वय 24.रा.निपाणी) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्यांच्या कडील 3 लाख 78 हजार रुपये किमंतीचे सोन्याच्या दागिन्यांसह मोबाईल जप्त करून पुढ़ील तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिक माहिती अशी की, राजेंद्रनगर येथील रेव्हेन्यू सोसायटीत रहात असलेल्या सौ.सोनाली दिलीप नरके (वय 56) ह्या सोमवार( दि 30) रोजी दुपारी एक ते सव्वा एकच्या सुमारास शिवाजी पुतळा येथे बस मधुन उतरत असताना त्यांची रोख रक्कमसह मोबाईल आणि सोन्याच्या दागिन्याची पर्सची चोरी झाली होती.याची शोधाशोध केली असता ती सापडत नसल्याने त्यानी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास या गुन्हयांचा तपास करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.या अनुशंगाने तपास करीत असताना ही चोरी कागल व राजेंद्रनगर येथील महिलांनी केल्याची माहिती मिळाली असता गुरुवार (दि.03) रोजी या महिलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस धनाजी पाटील,अमित सर्जे ,विनोद कांबळे,महिला पोलिस धनश्री पाटील व तृप्ती सोरटे आदीने केली.