प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- बत्तीसशिराळा तालुक्यातील इंगरुळ येथील अभिजीत मधुकर पवार (वय 22.रा .जांभळेवाडी ) याचा गुरुवार (दि.24) रोजी रात्री नऊच्या सुमारास बत्तीसशिराळा येथील पाडळी रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी बत्तीसशिराळा येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना शुक्रवारी दुपारी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हा रात्रीच्या सुमारास जांभळीवाडीतुन शिरसीकडे आपल्या मोटारसायकल वरुन नातेवाईकाकडे जात असताना मोटारसायकल स्लिप होऊन खाली पडल्याने त्यात गंभीर जखमी झाला होता.त्याच्यावर तेथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना मृत्यु झाला.अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.अभिजीत हा ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणुन काम करीत होता.त्याच्या पश्च्यात आई वडील आणि एक बहिण आहे.